महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार : १५ डिसेंबर ते १५ जानेवारी राज्यात ‘अतिथंड’ कालावधी ; महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व भागात आजपासून (ता. १४) हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल, तर मध्य व पश्चिम भागात १०१२ हेप्टापास्कल इतके राहण्याचे थंडीची तीव्रता अधिक जाणवेल. तर पश्चिम मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव मध्यम स्वरूपात जाणवेल. वाऱ्याची दिशा उत्तर व ईशान्य दिशेने राहील. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात घसरण होऊन रात्री आणि पहाटे थंडीची तीव्रता अधिक राहील. तसेच सकाळी बंडाळी तीव्रता अधिक राहील. दुपारच्या वेळी देखील थंड लहरी जाणवतील. यापुढील काळात कमाल व किमान तापमानातील घसरण सुरुच राहून थंडीच्या तीव्रतेत वाढ होईल. दुपारी हवामान थंड व कोरडे राहील.
साधारण १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा अतिथंड कालावधी राहील. या आठवड्यात महाराष्ट्राच्या उत्तरेकडे व पूर्व भागात १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदविले जाण्याची शक्यता राहील. या आठवड्यात वाऱ्याची वेग वाढेल. त्यातूनच थंड लहरी जाणवतील. महाराष्ट्रातील बहुतांशी भागात आजपासून (ता. १४) हवामान अत्यल्प ढगाळ राहणे शक्य आहे. वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन वारे आग्नेयेकडून व पूर्वेकडून वाहणे शक्य आहे.
















